भजनी मालिका

भजने

श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भले बुरे त्यास कळे कांहीं ॥१॥ वेश्यांचा धर्म द्रव्य ते हरावें । भलें बुरे भोगावें न कळें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

षडवैरियांचा करावा आधीं नाश । मग सुखें संन्यास घ्यावा जगीं ॥१॥ आशा मनीषा यांचा तोडोनियां पाश । मग मुखें संन्यास घ्यावा आधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

षड्‍गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनी स्वानंद सर्वातीता ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

षड्‍चक्र भेदोनी जातां उर्ध्वपंथें । ध्वनि अनुहात उमटे तेथें ॥१॥ तये ध्वनीमाजी मग्न होय मन । योगसिद्धि जाण कैसी घडे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संकल्प विकल्प नका वायां । धरा पायां विठोबाच्या ॥१॥ सर्व तीर्था हेचि मुळ । आणीकक केवळ दुजे नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संकल्पाचा मळु नेत्रीं नीडारला । त्यालागीं तो डोळा काय दिसे ॥१॥ जेथें देखों तेथें तोचि तो कोंदला । विश्वामाजी भरला विश्वंभर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संकल्पे विकल्पें रामानाम घेतां । कोटीकुळें तत्त्वतां उद्धरती ॥१॥ अमृत सहजीं थेंब मुखी पडे । मृत्युचें सांकडे चुके जेवीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसनाची जाली स्वयें ॥१॥ आतां चाखावें तें काये । जिव्हा अमृता वाकुल्या वाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥१॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सकळ तीर्थे । घडती करितां नामस्मरण । देवाधि देव उत्तम । तोही धांवे समोरा ॥१॥ पहाहो वैषणवांचे घरीं । सकळ तीर्थे कामारी । ऋद्धिसिद्धि मोक्ष चारी । दास्यत्व करिती सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ