भजनी मालिका
← भजनांकडे परत

षटचक्रें बंद निघूनियां गेली

shatachakren band nighuniyan geli

षटचक्रें बंद निघूनियां गेली । पाहों जो लागलीं तयां गांवा ॥१॥ निरंजन सभराभरीत वस्तू कोंदली । साक्षत्वासी आली आत्मदशा ॥२॥ वृत्ति झेंपावली आनंद झाला सैरा । सत्रावी येरझारा करी जेथं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे लक्ष लावीं आकाशीं । ब्रह्म पावसि लौकरी तूं ॥४॥