भजनी मालिका
← भजनांकडे परत

षडवैरियांचा करावा आधीं नाश । मग सुखें संन्यास घ्यावा जगीं

shadavairiyancha karava adhin nash | mag sukhen sannyas ghyava jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
षडवैरियांचा करावा आधीं नाश । मग सुखें संन्यास घ्यावा जगीं ॥१॥ आशा मनीषा यांचा तोडोनियां पाश । मग मुखें संन्यास घ्यावा आधीं ॥२॥ एका जनार्दनीं संकल्पाचा त्याग । सुखें संन्यास मग घ्यावा आधीं ॥३॥