भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसनाची जाली स्वयें

sakal godiye jen god ahe | ten rasanachi jali svayen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसनाची जाली स्वयें ॥१॥ आतां चाखावें तें काये । जिव्हा अमृता वाकुल्या वाये ॥२॥ तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभा ॥३॥ एका जनार्दनीं गोड । तया क्षण एक रसना न सोडी ॥४॥