भजनी मालिका

भजने

भवसिंधु तराया एकचि उपाय । ध्यावे तुझे पाय वासुदेवा ॥१॥ गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली ॥१॥ न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भवसिंधुचा पार तरावयालागीं । साधन कलियुगीं आणिक नाहीं ॥१॥ अहनिंशीं नाम जपा श्रीरामाचें । सकळ धर्माचे मुगुटमणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भवसिंधुचा पार तरे तो पोहणार । बळिया परम धीर भजनशील ॥१॥ नामची सांगडी लावूनि कासे । दृढ प्रेमरस वोसंडती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥ पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥ मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भवाब्धिसागरीं मांडिली टिपरी परि अनुहातें वाजे गजरु वो ॥ ताळक छंदें उमटती पदें वरि टिपरें टिपरीं गाजेवो ॥१॥

भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

भाकसमुद्रीं भरियेलीं केणें । आणियेलें नाणें द्वारकेचें ॥१॥ बाराही मार्गाची वणीज्ज करी । पंढर हे पुरी नामदेव ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपुलिया गड्या भाविकांसि ॥१॥ भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भागलासि देवा धांव धांवणिया । दाखविसी पायां पांडुरंगा ॥१॥ गजेंद्र गणिका तुम्हां श्रमविलें । मी काय उगलें परदेशी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव