भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया

bhavachiya bhenen yeton kakulati | dhanve karunamurti devaraya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥ पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥ कवणाची असा पाहूं कोणीकडे । जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥ गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥