भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधुचा पार तरे तो पोहणार । बळिया परम धीर भजनशील

bhavasindhucha par tare to pohanar | baliya param dhir bhajanashil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भवसिंधुचा पार तरे तो पोहणार । बळिया परम धीर भजनशील ॥१॥ नामची सांगडी लावूनि कासे । दृढ प्रेमरस वोसंडती ॥२॥ सत्वाचा सुभट असंग एकट । वैराग्य उद्‌भट निर्वासन ॥३॥ कामक्रोध जेणें घातले तोडरीं । निर्दाळिले वैरी लोभदंभ ॥४॥ रजतमाचे जेणें तोडिले अंकुर । केला अहंकार देशधडी ॥५॥ नामा म्हणे जया नामी अनुसंधान । तोचि परम धन्य त्रिभुवनीं ॥६॥