भजनी मालिका

भजने

बैसता चोरापाशीं तैसी होय बुद्धी । देखताची चिंधी मन धावे ॥१॥ व्याभिचाऱ्यापासी बैसता क्षणभरी । देखताची नारी मन धावे ॥धृ ॥.

रचनाकार: संत तुकाराम

बैसला तोचि माझिये ध्यानीं । कटीं कर दोन्ही वसवितां ॥१॥ नयनाचि माजीं नवचे दुरीं । आंतु बाहेरीं कोंदला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बैसला होता पाटावरी । तोचि थरारिला ते अवसरीं । निसटोनियां पृष्ठीवरी बैसला । अवचिता निघातें ॥१॥ वढिला येऊनियां चौपाशीं । घरोघरींच्या पिढियांनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बैसलियां दोघें भ्रतारवल्लभें । उदरींचा गर्भें तेंचि ध्यान ॥१॥ भक्ति नवमास भरले पूर्ण दिवस । आलें वैराग्य डोळस मूर्तिमंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणीं । जेवी शारंगपाणी आनंदानें ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव नारदमुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥ धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढें येक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥ पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बैसवूनि आले गोधनें आखरीं खेळ नानापरी मांडियेला ॥१॥ वाजविती पावे मोह्या घमुती । छंदें त्या नाचती गाती ब्रीदें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बैसायासी गेलों पितीयाचे अंकीं । उठविलें एकी माउलीनें ॥१॥ सरेना सरेना कोणी उठवीना । ऐसा ठाव जाणा वांछितसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बैसोनि एकांतीं गुरुगम्य गोष्टी । वेदांत परिपाठी शास्त्र बोध ॥१॥ नित्यशुद्धबुद्ध निर्विकार पूर्ण । उमेसी जें ज्ञान शिव सांगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव