भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी

baisalonse darin | dharanen kondoni bhikari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥ आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥ किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥ माझें मज नारायणा । देतां का रे नये मना॥३॥ भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥ तुका म्हणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥