भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसता चोरापाशीं तैसी होय बुद्धी । देखताची चिंधी मन धावे

baisata chorapashin taisi hoy buddhi | dekhatachi chindhi man dhave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसता चोरापाशीं तैसी होय बुद्धी । देखताची चिंधी मन धावे ॥१॥ व्याभिचाऱ्यापासी बैसता क्षणभरी । देखताची नारी मन धावे ॥धृ ॥. प्रपंचाचा छंद टाकुनिया गोवा । धरावे केशवा हृदयात ॥२॥ सांडुनीया देई संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥३॥ तुका म्हणे तुला सांगतो मी एक । रुक्मीणीनायक मुखी गावा ॥४॥