भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा

baisalon ton kadiyevari | navhen duri vegala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥ घडलें हें बहुता दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥ बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥ दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥ पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली ॥४॥ तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥