भजनी मालिका

भजने

पहा पहा उसां बैसलासे काळ । भरली ते वेळ न चुके मग ॥१॥ सर्वही संबंधीं असतां जवळी । नेईल तात्काळीं तुजलागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पहा हो पहा वृदांवनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥ गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पहाला तो दीन हरिखाचा आम्हां । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखों श्रीरामा ॥१॥ काय सांगु गोविंदा तुझीं आवडी । जनीं वनीं नयनीं नीत नवी गोडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पहालें रे मना पहालें रे । बुद्धिबोधें इंद्रियां सम जालें रें ॥१॥ नयनीं पहातां न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त । देखिलिया चित्त्‍ा समाधान ॥१॥ क्षणभंगुर हा येथींचा पसारा । याचिलागीं करा त्वरा आतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पहिला बागुल तो ऐसा । त्याचें नांव म्हणती मासा । शंखासुर वधिला कैसा । चारी वेद आणिले ॥१॥ कृष्णा राहेरे उगला । नाहीं तर सांगेन त्या बागुला । घुसळणाशी उशीर झाला । रवी सोड गोविंदा ॥धृ॥

रचनाकार: संत नामदेव

पहिली माझी ओवी ओवीन जगन्न । गाईंन पवित्र पांडुरंग ॥१॥ दुसरी माझी ओवी दुजें नाही कोठें । जनी वनी भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाईक तो जाणे पाईकींचा भाव । लागबग ठाव चोरवाट ॥१॥ आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥ तो एक पाईक पाईकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम