भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा हो नवल गोरियाचे घरी

paha ho naval goriyache ghari

रचनाकार: संत बंका · अभंग
पहा हो नवल गोरियाचे घरी । कुल्लाळ भीतरीं स्वयें झाला ॥१॥ त्रैलोकी गमन ते झाले गाढव । आपुलें वैभव परतें ठेवी ॥२॥ गोणी भरोनियां स्वयें आणी हरी । त्याचें साहित्य करी रखुमाई ॥३॥ वंका म्हणे ऐसी आवडी भक्ताची । बोलतां वेदांची वाचा मौन्य ॥४॥