भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहाला तो दीन हरिखाचा आम्हां । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखों श्रीरामा

pahala to din harikhacha amhan | sarvabhutin abhinna sada dekhon shrirama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पहाला तो दीन हरिखाचा आम्हां । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखों श्रीरामा ॥१॥ काय सांगु गोविंदा तुझीं आवडी । जनीं वनीं नयनीं नीत नवी गोडी ॥२॥ निमिष्य जैसें वर्ष तैसें आम्हां गोडी । हरिरुप पाहता हरिखे मनबुद्धि वेडी ॥३॥ जनवनमन अवघें जालें जनार्दन । एकाएकी पाहतां तेथें हारपले मन ॥४॥