भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा

paik to praja rakhoniyan kul | parakhiya mul chhedi dushta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥ तो एक पाईक पाईकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाईका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥२॥ विश्वासावांचूनि पाईकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥ तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाईका जतन करी त्यासी ॥४॥