भजनी मालिका

भजने

अगणित गुण वर्णिती पुराणें । पंढरीचे राणे ख्याती जयीं ॥१॥ अलक्ष भेटी लक्षिताची नाहीं । पुंडलिकें कांहीं तप केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥ कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगम्य सामर्थ्य नयेचि गणना । तारूनि पाषाणा केलें सम ॥१॥ तारिसी वान्नर अवघेची सेना । तोडिसी बंधना पांडु-रंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अगा ए सावळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥ बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥ ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अगा पांडुरंगा भक्तजन कैवारी । सेवकजन द्वारीं तिष्ठताती ॥१॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान हा पाही । आली मुक्ताबाई चांगदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥१॥ अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अगा ये नरकासुरमर्दना । कुशदैत्यनिकंदना । अगा कंसमधुकैटभसूदना । अगा मर्दना हिरण्याक्षा ॥१॥ अगा वृत्रासुरनिहंत्या । हिरण्यकश्यपा विदारित्या । अगा रावण संहारित्या । कुंभकरणादीराक्षसां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें ॥१॥ तुझें काय खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें ।। १।। तुझें काय खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण||२||

रचनाकार: संत गोणाई

अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥१॥ अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बळिबंध वामना। अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम