भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगम्य सामर्थ्य नयेचि गणना । तारूनि पाषाणा केलें सम

agamya samarthya nayechi ganana | taruni pashana kelen sam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगम्य सामर्थ्य नयेचि गणना । तारूनि पाषाणा केलें सम ॥१॥ तारिसी वान्नर अवघेची सेना । तोडिसी बंधना पांडु-रंगा ॥२॥ काय वनचर जाणती प्रत्यक्ष । परिक्षिती साक्ष दिस सातां ॥३॥ कृतत्रेतद्वापारांचे आदि अंतीं । नामाचिते ख्याति म्हणे नामा ॥४॥