भजनी मालिका

भजने

नंदनवन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नंदाचिये घरीं चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तं-डाचा ॥१॥ पक्कानेंही नाना रोटिया भरीत । केलीं अपरमित यशोदेनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नंदालागीं तेव्हां ह्मणे चक्रपाणी । जावें तुह्मीं सकळांनी गोकुळासी ॥१॥ अहर्निशीं माझें करावें चिंतना । दु:ख सांडी मना नंदराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥ येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नंदें सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी । नासूं देगे याशी दहीं दूध ॥१॥ मजला लेंकरें नाहींत गे फार । विश्रांतीसी घर एवढें आहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नभ नभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे काळिंदी जळें । सासिंनले जगाचे डोळे । तें रुप पाहावया । भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची धांव । लावण्यसिंधु सिंव सांडूनि जातो गे माये ॥१॥

नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया ॥१॥ आतां मी गाईन गुण नाम कीर्ति । जेणें चारी मुक्ति दासी होती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नमावे हे नित्य नित्य सदगुरुचे पाय । आन तो उपाय करुं नये ॥१॥ गुरुचरनांविण मानुं नये कांहीं । वेद शास्त्र पाहीं हेंचि सांगे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नमुं जाय तंव गुरुत्वा । तंव त्रैलोक्य आलें गुरुत्वा ॥१॥ तें आतां नमना नुरेचि गुरु । गुरुत्वा आला संसारु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥ संवत्सर ग्राम कर्‍हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ