भजनी मालिका
← भजनांकडे परत

नंदाच्या घराला । मज नेईं गोकुळाला

nandachya gharala | maj nein gokulala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नंदाच्या घराला । मज नेईं गोकुळाला ॥१॥ माया उपजली तेथें । ठेवीं मज आगीं येथें ॥२॥ म्हणसी असे रक्षपाळ । ते म्यां मोहिले सकळ ॥३॥ आच्छादित रूप । नामा ह्मणे माझा बाप ॥४॥