भजनी मालिका

भजने

देतां आलिंगन नंदाच्या कुमरा । पडेल उतार हे वांचेल सुंदरा । नका आड घालूं संदेह दुसरा । लावा उठवूनि जाऊं दया इतरां वो ॥१॥ ऐसे बोलती त्या जीवीच्या जिवलगा । झाला विरह गे वांचवा सुभगा । आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा । दुजा उपावोचि नचले या प्रसंगा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देतां कांहींचि न घेती । भुक्ति मुक्ति रिध्दीसिध्दी ॥१॥ म्हणोनियां संकट थोर । वाटे दुस्तर मज यांचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देतां शिव्या हांसो लागे । निंदा श्लाघ्ये ऐकोनी ॥१॥ करिती त्यांचे असघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देतो मोक्ष मुक्ति वाटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ॥१॥ सांवळें रुपडें गोजिरें गोमटें । उभें पुडंलीके पेठें पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥ जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव आणि नामा उभे भीमातीरा । प्रेमें येरयेरा आळविती ॥१॥ देव म्हणे नाम्या ऐकें गुह्य गोष्टी । संसाराची तुटी जेणें होये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव आणि भक्त करिती जयजयकार । नाम घोष अंबर गर्जतसे ॥१॥ आनंदे वैष्णव हरिकथा करिती । गाती नाचताती प्रेमछंदे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव आणि भक्ति एकचि विचार । दुजे पाहे तयां घडे पातक साचार ॥१॥ देव आणि श्रुति सांगती पुराणें । देव आणि भक्त एकरुपपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥१॥ भक्त म्हणती नेघों देवा । पुरे आम्हां तुझीचि सेवा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा