भजनी मालिका
← भजनांकडे परत

देतां आलिंगन नंदाच्या कुमरा । पडेल उतार हे वांचेल सुंदरा । नका आड घालूं संदेह दुसरा । लावा उठवूनि जाऊं दया इतरां वो

detan alingan nandachya kumara | padel utar he vanchel sundara | naka ad ghalun sandeh dusara | lava uthavuni jaun daya itaran vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देतां आलिंगन नंदाच्या कुमरा । पडेल उतार हे वांचेल सुंदरा । नका आड घालूं संदेह दुसरा । लावा उठवूनि जाऊं दया इतरां वो ॥१॥ ऐसे बोलती त्या जीवीच्या जिवलगा । झाला विरह गे वांचवा सुभगा । आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा । दुजा उपावोचि नचले या प्रसंगा वो ॥२॥ आहे ठाउकें हें अंतरी आम्हांसी । याचा वेध झाल्या दशाचि हे ऐसी । होते आटणी गे जिवा आणि शिवासी । तेथें देहबुध्दी नाठवे देहासी वो ॥३॥ हदयी होतांचि या कामाचा संचार । न्यावा एकांतासि निष्काम यदुवीर । देईल सुख तोचि नाहीं ज्यासि पार । सांडा चावटी आणिक विचार वो ॥४॥ नाहीं अनुभव हा ठाउका जयासी । त्याचि भोगिती या अनुदिनीं दु:खासी । येती जाति पुन्हा होति कासाविसी । आम्ही न विसंबो या सावळया कृष्णासी वो ॥५॥ नाही जीवीं या जीविताचि चाड । याच्या संगसुखें घालूं वो धुमाड । स्वामी निळयाचा पुरवील कोड । आणा तोचि आतां सांडा बडबड वो ॥६॥