भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आणि भक्ति एकचि विचार । दुजे पाहे तयां घडे पातक साचार

dev ani bhakti ekachi vichar | duje pahe tayan ghade patak sachar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव आणि भक्ति एकचि विचार । दुजे पाहे तयां घडे पातक साचार ॥१॥ देव आणि श्रुति सांगती पुराणें । देव आणि भक्त एकरुपपणें ॥२॥ एका जनार्दनीं जया समता दृष्टी । भक्ता पाहतां देवा होतसें भेटी ॥३॥