भजनी मालिका

भजने

तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्ही सदाचार महंत ब्रह्मवादी । तुमची वाग्‌नदी ब्रह्मरुप ॥१॥ सत्य वचन जळ पवित्र तें निर्मळ । कृतार्थ तेणें केवळ जालोंसे मी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥ कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥ गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरु तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ध्रु०॥

तुळसी पुष्पांहूनि आगळी । वृंदावनीं ते मिरवली । देवें मस्तकीं वंदिली । वंद्य झाली तिहीं लोकां ॥१॥ तुळसी वंदाची माउली । अरे हे संतांची साउली । तुळसीपासीं वनमाळी । सदा रहात असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुळसी बेल पुष्पें समर्पिलीं वर । पाहाती ऋषीश्वर पहिली पूजा ॥१॥ नारा विठा गोंदा पाठविलाअ महादा । झाडावया शेजा पुढें जाले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव