भजनी मालिका

भजने

तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्य ऐसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां॥१॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाठी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तारिलें वो येणें श्रीगुरुनायके । बोधाचिये कासे लावुनि कवतुकें ॥१॥ या भवसागरीं जलासी तुं तारुं । परतोनियां पाहो कैंचा मायापुरु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तारीं मज आतां रखुमाईच्या कांता । पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनि बोलताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।।

रचनाकार: संत लिंबाई

तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥१॥ तरीच खेळ भला रे वायां काय गलबला । एकावरी एक खाली पडतां मारी यमाजी टोला रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तारुण्याच्या बळें घेऊं धांवाशिल झोंबी । पडलिया तळीं हांसो लागतील उभी ॥१॥ घेसी तरी घेई हरीसवें घाली मिठी । नेदी पडो तोचि वंदय करील ये सुष्टी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥१॥ अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे ह्मैसा जनामधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची ॥१॥ कलियुगी जग आत्याती करिती । साहवेना कीं यासी कांहीं केल्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य जैसे प्रकाशले ॥१॥ धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य तो निधान ज्ञानदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥ म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । अवघे साव चित्त तों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम