भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची

tighanjananlagin kelen samadhan | sangitali khun antarinchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची ॥१॥ कलियुगी जग आत्याती करिती । साहवेना कीं यासी कांहीं केल्या ॥२॥ पापी उद्धरिले पतित तारिले । जड पावविले मोक्षपंथीं ॥३॥ नामा म्हणे याचें करितां समाधान । कळलें अंतःकरण मन यांचें ॥४॥