भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी

tarunyachen maden gheshi ekamenkan jhobin | vayan jail naradeh dharin harishi jhombi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥१॥ तरीच खेळ भला रे वायां काय गलबला । एकावरी एक खाली पडतां मारी यमाजी टोला रे ॥२॥ हातीम हात धरुनियां घालिसी गळां गळाखोडा रे । फजीत होसी खालीं पडतां हांसतील पोरें रांडा रे ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे खेळ नोहें भला रे । आपण न पडतां दुजियासी पाडी तोचि खेळिया भला रे ॥४॥