भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारुण्याच्या बळें घेऊं धांवाशिल झोंबी । पडलिया तळीं हांसो लागतील उभी

tarunyachya balen gheun dhanvashil jhombi | padaliya talin hanso lagatil ubhi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तारुण्याच्या बळें घेऊं धांवाशिल झोंबी । पडलिया तळीं हांसो लागतील उभी ॥१॥ घेसी तरी घेई हरीसवें घाली मिठी । नेदी पडो तोचि वंदय करील ये सुष्टी ॥२॥ एकाहूनि एक बळी नये तुझया ध्याना । कुंथोनियां येसी तळा होईल तनाना ॥३॥ निळा म्हणे झोंबीलोंबी घेंई काळासवें । श्रीहरीच्या बळें मग वांटसील नांवे ॥४॥