भजनी मालिका

भजने

अवघें आयुष्य काळाधीन जाहलें । परी चित्त गुंतलें संसारांत ॥१॥ सापें दर्दूर गिळियेला मुखीं । तेणेंचि तो शेखीं मक्षिका धरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवघे करुनि जयजयकार । हषें झाले सुखनिर्भर । म्हणती आतां वारंवार । भय संकोचि न धरावा ॥१॥ तंव यशोदा म्हणे पूर्वीही ऐसें । गर्गाचायें कथिलें विन्यासें । राशिनक्षत्राचेनियां मिसे । उदंड भाषार्थ सांगितला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला । नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तोचि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघें तीर्थ तीर्थरूप । परि तें विठ्ठाल चरणीचें स्वरूप । विठ्ठाल देखिलिया नि:पाप । जीवजंतु होताती ॥१॥ एवढें क्षेत्र पांडुरंग । सर्वां तीर्थांमाजी अभंग । धरिलिया संतसंग । महादोष हरताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघे ते दैवाचे विठठल म्हणती वाचे । अवघे कुळ त्यांचे पुण्यवंत ॥१॥ अवघेचि संसारीम जाणावे ते धन्य । ज्यांचे प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघे ते संसारीं जाणावे ते धन्य । ज्यांचें प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥१॥ अवघे ते दैवाचे विठ्ठल ह्मणती वाचे । अवघें कुळ त्याचें पुण्यरूप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥ अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव