भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे

avaghe te daivache | viththal viththal vadati vache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे ॥१॥ अवघा धंदा दुजा नाहीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥ अवघा संसार करिती । वाचे अवघे विठ्ठल म्हणती ॥३॥ अवघीं कर्में घडलीं तया । अवघें विठ्ठलाचि पायां ॥४॥ अवघा एका जनार्दनीं । अवघा जनीं जनार्दनीं ॥५॥