भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे चुकविले सायास ।तप रासी जीव नाश

avaghe chukavile sayas |tap rasi jiv nash

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघे चुकविले सायास ।तप रासी जीव नाश ॥१॥ जीव देऊनियां बळी ।अवघी तारिलीं दुबळी ॥ध्रु.॥ केला भूमंडळी । माजी थोर पवाडा ॥२॥ काहीं न मागे याची गती । लुटवितो जमा हाती ॥३॥ तुका म्हणें भक्तराजा । कोंण वर्णी पार तुझा ॥४॥