भजनी मालिका

भजने

ज्यासी प्रतिज्ञा निर्धारीं । देवा हारी आणियेलें ॥१॥ तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥ भवव्याधि येणें तुटेल रोकडा । करूनियां झाड निश्चयेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥ काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झांकावले डोळे शंका करी मनीं । दिवस कीं यामिनी हें न कळें ॥१॥ महा तेज:पुंज फांकती सकळ । सिंधूचा झळाळ भोंवताला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

झाडे वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥ वल्कलें नेसुनि ढुंगा गुंडाळुन । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाला अभिमान धन्य आम्हीं आतां । लक्षुमीच्या कांता भोगीतसों ॥१॥ गुप्त झाला तेव्हां वैकुंठनायक । करिताती शोक सकळीक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव