भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यासी प्रतिज्ञा निर्धारीं । देवा हारी आणियेलें

jyasi pratidnya nirdharin | deva hari aniyelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्यासी प्रतिज्ञा निर्धारीं । देवा हारी आणियेलें ॥१॥ तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामीं ॥२॥ शस्त्र न धरें ऐसा बोलु । साचा केला संग्रामीं ॥३॥ विकल पडतांचि अर्जुन । धरिलें सुदर्शन हस्तकी ॥४॥ ऐसा कृपेचा कळवळा । एका जनार्दनीं पाळी लळा ॥५॥