भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्योत परब्रम्हीं होय । खेचरी दर्पणीनें पाहे

jyot parabramhin hoy | khechari darpaninen pahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्योत परब्रम्हीं होय । खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥ ईडा पिंगळा सुशुन्मा । तिन्ही पाहे ह्रदयभूवना ॥२॥ हळू हळू रीघ करी । सूक्ष्म ह्रदय अंतरीं ॥३॥ हदय कमळावरी जासी । जनी जणे मुक्त होसी ॥४॥