भजनी मालिका
← भजनांकडे परत

झांकावले डोळे शंका करी मनीं । दिवस कीं यामिनी हें न कळें

jhankavale dole shanka kari manin | divas kin yamini hen na kalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
झांकावले डोळे शंका करी मनीं । दिवस कीं यामिनी हें न कळें ॥१॥ महा तेज:पुंज फांकती सकळ । सिंधूचा झळाळ भोंवताला ॥२॥ गोमती ते नदी निर्मळ वाहात । बहु घुमघुमीत सुमनें भार ॥३॥ जाईजुई आणि कमळ कल्हारी । भ्रमर झुंकारी गुंजारव ॥४॥ नामा म्हणे मुनि पातला पूर्वद्वारा । पुढिल्या विचारा चित्त द्यावें ॥५॥