भजनी मालिका

भजने

ज्ञानाभिमान विश्वामित्रा । रंभेमागें जाला कुत्रा ॥१॥ ज्ञानाभिमान दुर्वासासी । म्हणोनी शापी अंबऋषी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥ मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥ म्हणोनियां अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ज्ञानियांचें ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकाचें प्रिय सुख वस्तु ॥१॥ तें हें समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरीं विठ्ठल रूप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

“ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव। भक्ती चांगदेव पुढारले॥ या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती। यांची काही भांती न घरावी।।

रचनाकार: संत परिसा

ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां । चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥ निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें । मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

ज्ञानेश्वर तुम्हीं निरविलें सोपान । केली बोळवण पांडुरंगा ॥१॥ तो आम्ही उत्सव पाहिलासे डोळां । चांगोबाचा सोहळा दाविला हरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवें जेविसीं नाहीं हृषीकेशी म्हणतसे ||१|| सांगितलें एक भलतेंचि बोलसी। आहे याचि प्रांति ज्ञानेश्वरा ||२||

रचनाकार: संत जनाबाई

ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥१॥ दशमीच्या दिवशीं महोत्सव आळंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्या काणें वेद श्रुति अनुवादिती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥ सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

ज्या ज्या आम्हांपाशीं होतील ज्या शक्ती । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥ अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम