भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माउली

dnyaniyacha raja dnyaneshvar mauli

रचनाकार: संत बंका · अभंग
ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माउली । खेचरा वोळली कृपासिंधु ॥१॥ ज्ञानदेवा चरणी खेचर शरण । नामदेवा पूर्ण कृपा केली ॥२॥ नामदेवें हात चोखियाचे शिरी । विठ्ठल ती अक्षरी उपदेशिले ॥३॥ वंका म्हणे माझा चोखा गुरु माउली । तयाचे पाउलीं लोटांगण ॥४॥