भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या ज्या आम्हांपाशीं होतील ज्या शक्ती । तेणें हा श्रीपती अळंकारूं

jya jya amhampashin hotil jya shakti | tenen ha shripati alankarun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्या ज्या आम्हांपाशीं होतील ज्या शक्ती । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥ अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥ ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प। बंधनाचें पाप चुकविलें ॥२॥ तुका म्हणे येथें उरला विठ्ठल । खाये बोले बोल गाये नाचे ॥३॥