भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानाभिमान विश्वामित्रा । रंभेमागें जाला कुत्रा

dnyanabhiman vishvamitra | rambhemagen jala kutra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञानाभिमान विश्वामित्रा । रंभेमागें जाला कुत्रा ॥१॥ ज्ञानाभिमान दुर्वासासी । म्हणोनी शापी अंबऋषी ॥२॥ ज्ञानाभिमान ब्रह्मीयासी । म्हणोनी चारेलें गाईवत्सांसी ॥३॥ ज्ञानभिमान नको देवा । एका जनार्दनीं देई सेवा ॥४॥