भजनी मालिका

भजने

छत्तिसांतील चेतना । तोचि पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितलें ॥१॥ तेची दैवी प्रकृति माया । तेचि बोध आणि तुर्या । ऐसें धनंजया । सांगितलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

छत्र चामरें उभा सन्मुख भोंवती । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥१॥ निंबें आणि नारळ गोण्याची पोफळें । उदंड तिहीं केळें आणियलीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

छळणे करुनी बोलतां । तात्काळ जाली समाधी अवस्था । सद्भावें विनटतां संतां । न कळे तत्त्वता काय देती ॥१॥ जाणा जाणते सकळ । ज्यासी निजप्राप्तीची कळवळ । तिहीं सांडोनि स्थळ । संतजन वंदावे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

छाया पैं वृक्षाची बैसतां सुख । तैसा संसार देख प्राणिमात्रां ॥१॥ गुंडती बळें गुंडती बळें । माझें माझें सळें काळतोंडें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

छायामंडपींचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टी भासतसे ॥१॥ परि त्या आधार दीपज्योति । कातडी नुसती येहवीं ते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥ तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥ नहिं एकदो सब संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम