भजनी मालिका
← भजनांकडे परत

छत्तिसांतील चेतना । तोचि पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितलें

chhattisantil chetana | tochi purush jana | henchi nivaduni arjuna | sangitalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
छत्तिसांतील चेतना । तोचि पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितलें ॥१॥ तेची दैवी प्रकृति माया । तेचि बोध आणि तुर्या । ऐसें धनंजया । सांगितलें ॥२॥ तेचि ॐकार अर्धं मात्रा । तेंचि महाकारण जाणा परा । एका जनार्दनीं सारा । निवाडा केला ॥३॥