भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग तरिलें कीर्तनीं । श्रीविठ्ठल नामवानी

jag tarilen kirtanin | shriviththal namavani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जग तरिलें कीर्तनीं । श्रीविठ्ठल नामवानी ॥१॥ ऐसा मंत्र अक्षरी । विठ्ठल विठ्ठल निर्धारीं ॥२॥ एका जनार्दनीं । विठ्ठल पाहे ध्यानीं मनीं ॥३॥