भजनी मालिका
← भजनांकडे परत

छायामंडपींचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टी भासतसे

chhayamandapinchin chitren disati | taisi srushti bhasatase

रचनाकार: संत निळोबा · अभंग
छायामंडपींचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टी भासतसे ॥१॥ परि त्या आधार दीपज्योति । कातडी नुसती येहवीं ते ॥२॥ तेविं आत्मप्रभा भासे । जग हें विलसे नानाकृती ॥३॥ निळा म्हणे गगनीं रवि । दावूनि जेविं अलिप्त ॥४॥