भजनी मालिका

भजने

घरधनि याण केला गुरू। बाई मी आतां काय करूं। असोनि नाहींसा संसारू। चमत्कार कृपेचा || १ || धांवे पावे गे मेसाई येथें कोणाचें न चाले कांहीं। सत्यपण तुझे ठायीं तरी हैं नाहिसें करी गे ||२||

रचनाकार: संत राजाई

घरा जावें ऐसें सांगे पुरुषोत्तम । ऐकोनियां श्रम फार होय ॥१॥ दयानिधि ऐके अगा मेघश्यामा । धाडूं नको आह्मां येथूनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घरा येतां बाळ देखिलें मातेनें । दाटली दु:खानें बोलवेना ॥१॥ आक्रंदोनि पुढें मोकळोनि धाये । नेणों कैसें काय झालें यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घरासी आले संत देखोनिया। म्हणे यासी खावया कोठुनी घालूं ॥१॥ ऐसा हा निर्धारीम दुष्ट दुराचारी। जन्मोनियां झाला भूमि भारी ॥२॥

रचनाकार: संत सेना

घरीं आपुलिया मातेपाशीं । देखोनियां मागें शशी । म्हणे देंईवा खेळावयासी । आणूनी तो मज हातीं ॥१॥ येरी म्हणे परिसे ताता । गगनींचा तो नये हाता । नको छळूं रे कृष्णनाथा । नाहीं तेंचि मागों नको ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

घरोघरीं अवघें लें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥ निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥ पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२

रचनाकार: संत एकनाथ

घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्‍हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥ भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागीं दखाविसी लीला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घरोघरी हेचि कथा । येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली‍ थोंर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥ नवलचि तें ऐकता परी कैसी शोशिली निमिशावरी । सांगती दासी त्या परिचारी । ऐका अपूर्व हे कथा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घांट गर्जे महाव्दारीं । विठ्ठल नामें वागेश्वरीं ॥१॥ निळा उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा