भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरा जावें ऐसें सांगे पुरुषोत्तम । ऐकोनियां श्रम फार होय

ghara javen aisen sange purushottam | aikoniyan shram phar hoy

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घरा जावें ऐसें सांगे पुरुषोत्तम । ऐकोनियां श्रम फार होय ॥१॥ दयानिधि ऐके अगा मेघश्यामा । धाडूं नको आह्मां येथूनियां ॥२॥ तुजसाठीं आह्मी सोडिलें भ्रतारां । चरणी देईं थारा देवराया ॥३॥ देव ना संसार आम्हां झालें कृष्णा । सांगावें हें कोणा दु:ख आतां ॥४॥ तुमचे भ्रतार वदिती आम्हांसी । सांग हषीकेशी भिऊं नका ॥५॥ सांगतांची ऐसें चालियेल्या सर्व । पाहाती केशव वेळोवेळां ॥६॥ द्विजाचे मानसीं होय अनुताप । द्विजाचे मानसीं होय अनुताप । भिंदिती आप आपणातें ॥७॥ भोजन करूनी गडी रामकृष्ण । निघती तेथून नामा म्हणे ॥८॥