भजनी मालिका

भजने

गायी गोप तेव्हां लपवोनी क्षणेक । जानकी नायक झाला देव ॥१॥ आकर्ण नयन हातीं धनुष्यबाण । करितसे ध्यान मारुतीचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गायी घेवोनियां जासी जेव्हां राना । आमुचिया मना दु:ख वाटे ॥१॥ सुकुमार सांवळीं जैसीं रातोत्पळें । त्याहूनि कोंवळे पाय तुझे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गायीवत्सगोपाळ केलीसे निर्मान । न लागतां क्षण परीक्षिती ॥१॥ पूर्ववत सर्व न्यून कांहीं नाहीं । करीत आपाही मनामाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गांवढे सहस्त्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्यक्षेत्रांचे एकचि जाण । सुकृत तितुकेंचि जोडे ॥१॥ ऐसें पुण्यक्षेत्रांचे दशशतक । तृप्त केलिया पाठक । पाहतां सुकृत । तितुकेंचि जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गासी तरि एक विठ्ठल चि गाई । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥१॥ अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा सीण करिसी वांयां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गिरजेप्रती शंकर उपदेशिले। तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे ॥१॥ ऐसें निज गुज साराचेंही सार। उघडे दाविलें साचार ज्ञानदेवें ॥२॥

रचनाकार: संत सेना

गीता गीता गीता त्रिवार बोलतां । पाप जाय तत्त्वतां मोक्ष जोडे ॥१॥ गीतेचा महिमा बोलवेना वाचे । बंधने जीवाची दूर होती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गीता गीता म्हणतां पाप होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥ गीतेचीं अक्षरें पडतां श्रवणीं । जाय तत्क्षणीं भवभय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥ नित्य वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गीता हेचि गंगा गुह्यभाव पैं गा । नाम हेचि वेगा सोडवण ॥१॥ सर्व ब्रह्म हरी सांगतसे मुरारी । विश्वरुप श्रीहरी आपण जाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गीतेचें आवर्तन त्यांचे ऐका पुण्य । सावध अंत:करण करुनियां ॥१॥ गीतेच्या सुकृता मौनावला विधाता । हरिहरां तत्वतां बोध जाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गीतेचें महिमान ऐकावें श्रवणीं । सावधान सज्जनीं द्यावें आतां ॥१॥ जयाचे अंतरी वसे नित्य गीता । पावन तत्वतां ब्रह्मरुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ