भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायी गोप तेव्हां लपवोनी क्षणेक । जानकी नायक झाला देव

gayi gop tevhan lapavoni kshanek | janaki nayak jhala dev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गायी गोप तेव्हां लपवोनी क्षणेक । जानकी नायक झाला देव ॥१॥ आकर्ण नयन हातीं धनुष्यबाण । करितसे ध्यान मारुतीचें ॥२॥ स्वामीचा तो धांवा ऐकोनियां कानीं । हडबडिला मनीं कपींद्र तो ॥३॥ निवोनी त्वरित वनामाजी आला । चरणसी लागला प्रेमभावें ॥४॥ म्हणे स्वामी कांहीं सेवकासी आज्ञा । करावी सर्वज्ञा दयानिधी ॥५॥ देव ह्मणे बारे काय सांगूं फार । पैल तो असूर येत आहे ॥६॥ तुझ्याहातें आहे तयासी मरण । ह्मणोनि स्मरण केलें तुझें ॥७॥ तयासी जावोनी मारीं त्वां आतां । चरणीं ठेवूनि माथा निघाला तो ॥८॥ दुर्जनें तेवेळीं मारुती पाहिला । ह्मणे काळ आला कोठोनियां ॥९॥ धरूनियां नरडी केला गतप्राण । पुनरपि येऊन वंदीतसे ॥१०॥ नामा ह्मणे दोन्ही जोडोनियां कर । बोलिला उत्तर काय आतां ॥११॥