भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगीं

gayanache rangin | shakti adbhut he angin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगीं ॥१॥ हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥ अंगीं प्रेमाचें भरतें । नेघे उतार चढतें ॥२॥ तुका म्हणे वाणी । प्रेम अमृताची खाणी ॥३॥