भजनी मालिका
← भजनांकडे परत

गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां

gita gita vache je mhanati | nahin punaravrutti taya naran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥ नित्य वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥ एका जनार्दनीं जयाचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥