भजनी मालिका

भजने

कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान । वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥ त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार । जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुम्हांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥१॥ काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं मागणें हें आम्हां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥१॥ देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धि राहिलीसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांही माझे कळो आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिले ऐसे ॥१॥ नाही तरी येथे न घडे अनुचित । नाही ऐसी रीत तया घरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं सांगोनि गेले वचना । कृष्ण उपदेशी पंडुनं-दना । येथें राहतां पाविजे बंधना । थोर वर्तमान कलियुगीं ॥१॥ ये कलिमाझारीं । पुत्र पित्याचे वैरी । घरची माता होय कामारी । पुरुषांतें नारी अव्हेरिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांहींच नहोनियां कांहीं एक होता । नामारुपातीत आपण नेणता । होण्यानहोण्याच्या नेणोनियां वार्ता । त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥१॥ ऐशा परि हा मूर्तिमंत झाला । विश्वीं विश्वकार होऊनियां ठेला । भाग्यें आमुचिया मूर्ती मुसावला । गाऊ वानूं ऐसा आम्हांसी फावला वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काहे भुला धनसंपत्तीघोरे । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥१॥ राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥ एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

किंचीत सुख आगळें दु:ख । पावती अवश्यक व्यभिचारी ॥१॥ क्षयो व्याधी भगें पडतीं । जगनिंदय होती हे आधीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा