भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांही माझे कळो आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिले ऐसे

kanhi majhe kalo ale gunadosh | mhanauni udas dharile aise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांही माझे कळो आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिले ऐसे ॥१॥ नाही तरी येथे न घडे अनुचित । नाही ऐसी रीत तया घरी ॥ध्रु.॥ कळावे ते मना आपुलिया सवे । ठायीचेहे घ्यावे विचारूनी ॥२॥ तुका म्हणे मज अव्हीरीले देवे । माझीया कर्तव्ये बुद्धीचिया ॥३॥